गुढीपाडवा – शोभायात्रा, संस्कृती आणि मेळावा

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या आनंदाचा दिवस. असं म्हणतात की या दिवशी प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजयी प्राप्त करून अयोध्येत परतले आणि त्यानिमित्त गुढी उभारली होती आणि म्हणूनच गुढीला विजयी, समृद्धी आणि शुभारंभाचा प्रतीक मानले जाते.

मुंबईच्या गिरगावातील शोभायात्रा या सणाला लाभलेला एक शृंगार. या शोभायात्रेत मुलींची बाईक रॅली – ढोल ताशा आणि त्याच बरोबर लोकांनी साकारलेली विविध वेशभूषेतील वेग वेगळ्या परंपरेचं आभूषण आकर्षण ठरते.

आणि त्याच बरोबर दरवर्षी होणारा दादर – छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) येथे भव्य दिव्य राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा. या मेळाव्यात राज ठाकरे हे अनेक राजकीय व सामाजिक मुद्दे उपस्थित करत असतात. अनेकदा त्यांच्या ज्वलंत आणि आक्रमक भाषणामुळे वाद सुद्धा निर्माण होतात, एखादी दिशा सुद्धा ठरत असते आणि राजकीय समीकरण बदलतात.

आपल्या भाषणात मराठीचा मुद्दा, मराठी संस्कृती, मराठी माणूस हे केंद्र स्थानावर असतात; सत्ता जरी नसली तरी सत्तेला योग्य दिशेनी वळवणे हे राज ठाकरे यांना अचूक जमते. म्हणूनच गेल्या २० वर्षात या सणाला आणखी वेगळे असे महत्व निर्माण झालेले चित्र आपल्याला दिसून येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top