निसर्ग vs भाजप सरकार

आज अवघ्या देशात प्रत्येक प्रांतात निसर्ग जपण्यासाठी संघर्ष सुरू आहे महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर भारत, दक्षिण सर्व ठिकाणी जनतेचा एकच सूर आहे ते म्हणजे निसर्ग वाचवा.

जेव्हा पासून भारतीय जनता पक्ष सत्तेत बसला आहे तेव्हापासून ते विकासाच्या मुद्द्यावर ठाम आहेत परंतु विकास कसा, कोणाचा आणि कसा ह्याचा आत्मचिंतन करणे हे बहुदा भाजपा विसरली आहे. “तुम्ही निसर्ग जपा, निसर्ग तुम्हाला जपेल” हा विचार त्यांनी फार लांब सोडलेला दिसून येत आहे.

ज्या प्रभू श्री रामाच्या नावावर राजकारण भाजपा करत आहे त्याच रामाच्या तपोवनात आज कुऱ्हाड मारताना प्रभू श्री रामाच्या आत्मेस दुःख पोहोचवत आहोत असा विचार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवला नसावा. त्याच बरोबर मुंबईत आरे जंगल, कांदळवन हे उध्वस्त करण्याचा पाऊल हे अतिशय निंदनीय आहे.

सरकार जनतेचा कौल आणि मत नोंदवून घेण्यास का तयार नाही का? की सरकारला जनतेचा आवाज ऐकण्यात कमीपणा वाटू लागला की काय असे मत प्रत्येकाच्या जीवाशी पडत असावा.

सरकारनी वेळेत आत्मचिंतन केले पाहिजे अन्यथा तुमचा बळी एक दिवस निसर्ग नक्कीच घेईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top