समस्या अनेक पण चर्चा मात्र धर्मांतराची

या देशात विशेषतः महाराष्ट्रात इतक्या समस्या प्रलंबित असताना या सरकारच्या काळात विधानभवनात चर्चा कसली होते तर धर्मांतराची.

नाशिक मधल्या तपोवनातील वृक्षतोड, मुंबईत दूषित हवा त्याच बरोबर होणारे अनियमित बांधकाम, बिल्गेट्स द्वारे अवकाशात होणारे केमट्रेल्स, छत्रपती संभाजीनगर येथे रस्ता रुंदीकरणाच्या नावावर तोडली जाणारी जुनी झाडे, रोथचिल्ड याचा मोदी सरकार द्वारे NSE च्या महत्वाच्या पदावर होणारी नेमणूक.

इतके सगळे महत्वाचे मुद्दे बाजूला सारून निवडून दिलेले नेते विधानसभेत मुद्दा मांडतात धर्मांतराचा. अवघा देश धर्माच्या काळोखात ढकलून नेते मंडळी येणाऱ्या पिढीला गुलामगिरीच्या साखळदंडात अडकवून लोकशाहीची रोज गळा दाबून हत्या करत सुटलेत.

खर तर महाराष्ट्रातले आणि पर्यायाने देशाचे नेते आपल्या सर्वांची धर्माच्या आडून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दिशाभूल करत आहे, जेणेकरून आपण सर्व फक्त आणि फक्त धर्माच्या वेढ्यात अडकून पडाव आणि राज्य मात्र यांचाच रहावं.

आज देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्रात गरम सळसळत्या शिगा घुसवित आहेत आणि जनसामान्य माणूस निशब्द होऊन हतबल बसला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top